Breaking News

प्रदूषणाचा त्रास थांबवा, अन्यथा मोर्चा काढू

आमदार गणेश नाईक यांचा एमपीसीबीला इशारा

नवी मुंबई : बातमीदार

नवी मुंबई शहरात प्रदूषणामुळे नागरिक प्रचंड त्रासले आहेत. कोरोनाच्या काळात लोकांच्या आरोग्यावर याचे गंभीर परिणाम होण्याचा धोका असून जर प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्रदूषण थांबविले नाही तर मंडळावर मोर्चा आणून जाब विचारू, असा निर्वाणीचा इशारा आमदार गणेश नाईक यांनी दिला आहे

गेल्या काही दिवसात नवी मुंबईचा श्वास एमआयडीसी भागातून होणार्‍या प्रदूषणामुळे कोंडतो आहे. घणसोली कोपरखैरणे, बोनकोडे, खैरणे, कोपरी, पावना, तुर्भे वाशी, सानपाडा या भागात प्रकर्षाने आणि इतर सर्व भागात सकाळी आणि सायंकाळी वातावरणात दुर्गंधीयुक्त धूर पसरलेला असतो. प्रक्रिया न करता काही कंपन्या रासायनिक पाणी खाडीत सोडत असतात. ध्वनी प्रदूषणही वाढले आहे. आमदार नाईक यांनी प्रदूषणप्रकरणी महापालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर यांच्याकडे पाठपुरावा करत आहेत. आयुक्त बांगर यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाला पत्रही दिले मात्र मंडळाकडून कार्यवाही झाली नाही, अखेर नाईक यांनी माजी लोकप्रतिनिधींसह मंडळाच्या महापे कार्यालयावर धडक दिली. सोशल डीस्टन्स पाळून ही बैठक पार पडली.

कोरोना हा श्वसनासंबंधी विकार आहे. फुप्फुसावर विपरीत परिणाम करतो. प्रदूषित वातावरणात या आजाराने बाधित नागरिकांची प्रकृती आणखी खालावू शकते असे सांगून त्यांनी वायू, जल आणि ध्वनी प्रदूषण करणार्‍या कंपन्यांची माहिती प्रदूषण नियंत्रण मंडळाला संकलित करण्यास सांगितले. गरज असेल तर या कामासाठी जादा अधिकारी नेमा असेही सुचवले प्रदूषणकारी कंपन्यांची माहिती प्राप्त झाल्यावर त्याना नोटीसा द्या. त्या नंतरही त्यांनी प्रदूषण करणे सुरूच ठेवले तर मात्र सरळ कोणतीही हयगय न करता या कंपन्या जनतेच्या व्यापक आरोग्य हितासाठी बंदच करा, अशी मागणी केली.

प्रदूषणकारी कंपन्या शोधून कंपन्यावर कारवाई करण्यात येईल असे प्रदूषण नियंत्रण मंडळांच्या वरिष्ठ अधिकारी पाटील यांनी  मान्य केले. प्रदूषण नियंत्रणात आले नाही तर धडक  मोर्चा काढू असा इशाराच आमदार नाईक यांनी दिला. या वेळी माजी आ. संदीप नाईक, जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, माजी नगरसेवक रवींद्र इथापे, दशरथ भगत, शुभांगी पाटील, शशिकांत राऊत, चंद्रकांत उर्फ अण्णा पाटील, पुरुषोत्तम भोईर, उषा भोईर, मुनावर पटेल सुरज पाटील, अमित मेढकर, विठलशेठ धुमाळ, शशिकांत भोईर आदी उपस्थित होते.

Check Also

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये प्रदर्शन; रोबोट आकर्षण

खारघर ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये …

Leave a Reply