मुंबई : सोन्याचे दर गगनाला भिडणार असून वर्षअखेरपर्यंत सोने प्रति तोळे 50 हजार रुपयांपर्यंत मजल मारण्याची शक्यता जाणकार वर्तवत आहेत. एक हजार 550 डॉलरवर असलेले प्रति औंस सोन्याचे दर दोन हजार डॉलरपर्यंत वाढण्याची शक्यता वर्ल्ड गोल्ड काऊन्सिलने वर्तवली आहे. सध्या सोन्याचा प्रति 10 ग्रॅम दर सुमारे 39 ते 40 हजारांच्या आसपास आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्रति औंस एक हजार 550 डॉलरप्रमाणे एक लाख 8 हजार 500 रुपये प्रति ग्रॅम म्हणजे सुमारे तीन हजार 827 रुपये, इतके सोन्याचे सध्याचे दर आहेत. (1 औंस म्हणजे 28.35 ग्रॅम, 1 तोळा म्हणजे 10 ग्रॅम आणि 1 डॉलर म्हणजे 70 रुपये). हे दर प्रति औंस दोन हजार झाल्यास सोन्याची किंमत प्रति तोळे 50 हजारांच्या आसपास पोहोचणार आहे.