Breaking News

भाजप युवा मोर्चा तालुका उपाध्यक्षपदी जयेश पाटील

मोहोपाडा ः वार्ताहर

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जयेश संभाजी पाटील यांनी कमळ हातात घेतले आहे. त्यांची तालुक्यातील युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

नुकताच झालेल्या पक्ष  प्रवेश सोहळ्यात माजगाव, आंबिवली येथील तरुणांनी प्रक्षप्रवेश केला. यामुळे या परिसरात पक्ष वाढण्यासाठी मदत होईल. जयेश पाटील यांना महेश बालदी यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. या वेळी गजानन जगन्नाथ काठावले यांची माजगांव बूथ अध्यक्षपदी, विजय पांडुरंग ढवालकर यांची ग्रुप ग्रामपंचायत माजगांव गांव अध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली. या वेळी विनोद साबळे, तुकाराम जाधव, गणेश कदम-अध्यक्ष खालापूर तालुका, ग्रुप ग्रामपंचायत माजगाव-सरपंच  गोपीनाथ जाधव, रमाकांत जाधव, किशोर काठावले, महेश पाटील, कैलास पाठवले, नितीन काठावले, दीपक काठावले, सचिन काठावले, आत्माराम काठावले, शिवाजी शिंदे, आत्माराम जाधव, कल्पेश जाधव, निलेश जाधव, राजेश जाधव, राजेश  जाधव, किशोर देवघरे, बापू घारे, दर्शन पोळेकर, शरद काठावले आदि उपस्थितीत होते.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply