पनवेल ः रामप्रहर वृत्त
येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्यु. कॉलेजमध्ये शिक्षक दिनाचे औचित्य साधून अभिरूप शाळा भरविण्यात आली. या वेळी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी शिपायांपासून शिक्षक, प्राचार्यापर्यंत सर्व भूमिका पार पाडल्या.
प्राचार्या तनिष्का म्हात्रे, पूजा बगाटे, स्वयंम कोळी यांच्यासह 80 विद्यार्थ्यांनी शिक्षक, ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहाय्यक, क्रीडाशिक्षक, शिपाई आदी भूमिका पार पडल्या.
तनिष्का म्हात्रे, पूजा बगाटे व स्वयंम कोळी यांनी प्रशासकीय कामाचा अनुभव कथन केला.विद्यालयाच्या प्राचार्या साधना डोईफोडे यांनी अध्यक्षीय भाषणात शिक्षक दिनाचे महत्त्व विषद केले. या वेळी उपमुख्याध्यापक राजकुमार चौरे, पर्यवेक्षक दीपक भर्णूके, प्रयोगशाळा प्रमुख रवींद्र भोईर, क्रीडाशिक्षक जयराम ठाकूर, गुरुकुल प्रमुख संदीप भोईर, सांस्कृतिक विभागप्रमुख ज्योत्स्ना ठाकूर, विद्यार्थी, विद्यार्थिनी व रयत सेवक उपस्थित होते. या वेळी शिक्षक बनलेल्या विद्यार्थ्यांना व सर्व सेवकांना विद्यालयाच्या वतीने लेखणी भेट देण्यात आली. सागर रंधवे यांनी सूत्रसंचालन केले, तर चंद्रकांत पाटील यांनी आभार मानले.