उपजिल्हा रुग्णालयासाठी नगरसेवक राजू सोनींची आर्थिक मदत

पनवेल : वार्ताहर

पनवेल उपजिल्हा रुग्णालयाच्या आधुनिकीकरणाबरोबर आतील कामाच्या पूर्ततेसाठी आ. प्रशांत ठाकूर यांच्या आवाहनावरून पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक राजू सोनी यांनी 50 हजाराचा धनादेश रायगडचे पालकमंत्री ना. रवींद्र चव्हाण यांच्याकडे सुपूर्द केला.

विकास कामासाठी सर्वांनी हातभार लावावा, असे आवाहन पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले होते. या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक राजू सोनी यांनी 50 हजारांचा धनादेश रायगडचे पालकमंत्री ना. रवींद्र चव्हाण यांच्याकडे लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर, महापौर डॉ. कविता चौतमोल आदींच्या उपस्थितीत सुपूर्द केला. पनवेलकरांच्या सोयीसुविधांसाठी अत्याधुनिक असे पनवेल उपजिल्हा रुग्णालय उभारण्यात आले आहे. तेथे येणार्‍या गोरगरीब रुग्णांना सर्वतोपरी चांगल्या सोयीसुविधा मिळाव्यात व उपचार मिळावेत, यासाठी आपण नेहमीच मदत करण्यास तयार असल्याचे या वेळी नगरसेवक राजू सोनी यांनी सांगितले.

Check Also

Połączenie 30 darmowych spinów Mostbet z innymi bonusami

Połączenie 30 darmowych spinów Mostbet z innymi bonusami W dzisiejszym artykule skupimy się na tym, …

Leave a Reply