Breaking News

ठाकरे सरकारवर गुन्हा दाखल करा

महाड एसटी स्थानकात भाजपचे आंदोलन

महाड : प्रतिनिधी – पगाराविना आर्थिक विवंचनेत एसटी कर्मचारी आत्महत्या करीत आहेत, त्यांच्या आत्महत्येस राज्यातील  ठाकरे सरकार जबाबदार आहे. त्यामुळे ठाकरे सरकारवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करीत महाड भाजपच्या वतीने मंगळवारी (दि. 10) येथील एसटी स्थानकात आंदोलन करण्यात आले.

लॉकडाऊन आणि कोरोनाच्या महामारीत उत्तम सेवा पुरविणार्‍या एसटी कर्मचार्‍यांवर उपासमारीची वेळ आली आहे. राज्यातील ठाकरे सरकारच्या नियोजनशुन्य कारभारामुळे एसटी कर्मचार्‍यांचे गेले तीन महिने पगार झाले नाहीत. दिवाळीचा सण तोंडावर आला असताना आर्थिक विवंचनेत सापडलेल्या जळगाव येथील एसटी कर्मचारी मनोज चौधरी व रत्नागिरी येथील पांडुरंग गडदे यांनी आत्महत्या केली आहे. या घटनेला जबाबदार असलेल्या राज्यातील ठाकरे सरकारचा महाड भाजपच्या वतीने मंगळवारी येथील एसटी स्थानकावर निषेध करण्यात आला.

पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्यावर ज्याप्रमाणे गुन्हा दाखल करुन अटक झाली, त्याच पद्दतीने राज्यातील ठाकरे सरकारवरही गुन्हे दाखल करावेत, अशा मागणीचे  निवेदन यावेळी आगार व्यवस्थापक अनंत कुलकर्णी यांना  देण्यात आले. या वेळी ठाकरे सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

भाजप तालुकाध्यक्ष जयवंत दळवी, पोलादपूर तालुकाध्यक्ष प्रसन्न पालांडे, सरचिटणीस महेश शिंदे, अनिल मोरे, मंजुषा कुद्रीमोती, महिला मोर्चा तालुकाध्यक्षा रश्मी वाझे, चंद्रजित पालांडे, निलेश तळवटकर, प्रभाकर झांजे, प्राजक्ता दळवी, अक्षदा ताडफळे, जयेश जगताप, महेश निकम, पंकज बुटाला, दीपक घाशटे,  योगेश झांजे यांच्यासह भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

Check Also

खांदा कॉलनीतील ‘उबाठा’चे पदाधिकारी, कार्यकर्ते भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला लागलेली गळती सुरूच …

Leave a Reply