Breaking News

कोंडगाव-पायरवाडीतील कार्यकर्त्यांचा भाजपत प्रवेश

पेण : प्रतिनिधी

नागोठणे विभागातील कोंडगाव-पायरवाडी येथील कार्यकर्त्यांनी शुक्रवारी (दि. 13) भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. माजी मंत्री  रविशेठ पाटील यांनी त्यांचे भाजपमध्ये स्वागत केले. कोंडगाव-पायरवाडी येथील माजी सरपंच नाथा हंबीर, हिरामण हंबीर, काशिराम हंबीर, लिंबाजी उघडा, नारायण खंडवी, हरी पिंगळा, नामदेव उघडा, योगेश हंबीर, दिनेश हंबीर, राजू हंबीर, नामदेव शिद, हरी खंडवी, खुमा निरगुडे, राघो शिद, अंबाजी पिंगळा, रामा शिद, अनंता शिद, राया शिद, रामा शिद, सोम्या शिद आदींनी त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांसह या वेळी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपच्या माध्यमातून कोंडगाव-पायरवाडी या विभागातील विविध समस्या मार्गी लावण्याचे काम करण्यात येईल, असे आश्वासन या वेळी रविशेठ पाटील यांनी दिले. रविशेठ पाटील यांच्या पेण येथील वैकुंठ निवासस्थानी झालेल्या या कार्यक्रमास पंचायत समितीचे माजी उपसभापती मारुती देवरे, प्रवीण बडे, दीपक जांभेकर, गोकुळ पाटील, नामदेव मंडवी, सुभाष पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply