पनवेल ः रामप्रहर वृत्त
रायगड जिल्ह्यात कोरोना रुग्णांमध्ये पुन्हा घट होऊ लागली असून, मंगळवारी (दि. 1) नव्या 96 पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली असून, एकाचा मृत्यू झाला, तर दिवसभरात 140 रुग्ण बरे झाले आहेत.
पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल (मनपा 46 व ग्रामीण 19) तालुक्यातील 65, पेण 11, उरण व श्रीवर्धन प्रत्येकी पाच, माणगाव तीन, खालापूर व म्हसळा प्रत्येकी दोन आणि अलिबाग, रोहा व महाड तालुक्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे, तर मयत रुग्ण पनवेल तालुक्यातील आहे. दरम्यान, नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 57,241 आणि मृतांची संख्या 1604 झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 54,509 जण कोरोनामुक्त झाले असून, 1128 सक्रिय रुग्ण आहेत.
Check Also
वाढवण बंदर बाधित मच्छीमारांच्या प्रश्नांवर शासन सकारात्मक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार मंत्रालयात बैठक आमदार महेश बालदी यांची प्रधान सचिव लोकेश चंद्रा …
RamPrahar – The Panvel Daily Paper