Breaking News

मानघर ते आवळीचा मळा रस्त्याचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्त

तालुक्यात सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नांतून विविध ठिकाणी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत रस्त्यांची कामे मंजूर करण्यात आली आहेत. त्या अंतर्गत मानघर ते आवळीचा मळा या रस्त्याचे काम करण्यात येणार आहे. गुरुवारी (दि. 19) या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते करण्यात आले. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत पनवेल तालुक्यात विविध ठिकाणी रस्त्याची कामे सुरू करण्यात आली आहेत. त्या अंतर्गतच मानघर ते आवळीचा मळा येथील रस्त्याचे काम करण्यात येणार आहे. या कामाचे भूमिपूजन गुरुवारी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी नानोशीचे उपसरपंच वैभव पाटील, माजी सरपंच मोहनदास पाटील, सुभाष म्हात्रे, टीआयपीएलचे एम. पी. त्यागी, महादेव कांबळे, वडघर विभाग युवा अध्यक्ष मच्छिंद्र कटेकर, बुथ कमिटी अध्यक्ष समीर कटेकर, प्रभाकर पाटील, अशोक पाटील, काशिनाथ पारधी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

Check Also

रायगड तायक्वांडो असोसिएशनतर्फे बेल्ट परीक्षा उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव

आमदार प्रशांत ठाकूर यांचा विशेष सत्कार पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड तायक्वांडो असोसिएशनच्या वतीने बेल्ट परीक्षेत …

Leave a Reply