Breaking News

पनवेल तालुक्यात तीन नवे कोरोना रूग्ण

पनवेल : येथील महापालिका क्षेत्रात मंगळवारी (दि. 14) कोरोनाचे तीन नवीन रूग्ण समोर आले. यातील दोघे पनवेलमध्ये आढळलेल्या ओलाचालकाच्या घरातील सदस्य असून, एक व्यक्ती घोट गावातील आहे. त्यामुळे पनवेल तालुक्यातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या 30, तर रायगड जिल्ह्याचा आकडा 32वर गेला आहे. पनवेल शहरातील इस्रायल (विश्राळे) तलाव परिसरात राहणार्‍या कोरोनाबाधित ओलाचालकाच्या घरातील 10 सदस्यांची तपासणी केली असता, त्यापैकी दोघे पॉझिटिव्ह असून सहा सदस्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला, तर दोन सदस्यांचा रिपोर्ट येणे बाकी आहे. याव्यतिरिक्त घोट गावातील एक व्यक्ती 23 मार्चपासून स्वादुपिंडाच्या आजारावर उपचार घेण्यासाठी सायन हॉस्पिटलमध्ये दाखल होता. त्याचाही रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्याच्या आई-वडिलांची तपासणी करण्यात आली असून त्याचा रिपोर्ट येणे बाकी आहे.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply