Saturday , June 3 2023
Breaking News

वरेडीच्या उपसरपंचपदी भाजपच्या जयश्री वाघमारे

पेण : प्रतिनिधी

तालुक्यातील वरेडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी शुक्रवारी (दि. 1) भाजपच्या  जयश्री गजानन वाघमारे विराजमान झाल्या. उपसरपंच निवडीसाठी घेण्यात आलेल्या वरेडी ग्रामपंचायतीच्या विशेष सभेला ग्रामपंचायत सदस्य परशुराम पाटील, गजानन वाघमारे, श्वेता म्हात्रे, सारिका पाटील, प्रमिला पाटील आदि उपस्थित होते. वरेडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदावर भाजपचा झेंडा फडकविण्यासाठी रायगड जि.प.चे माजी विरोधी पक्षनेते वैकुंठ पाटील व हमरापुरचे सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली  रामचंद्र म्हात्रे, माजी सरपंच गोपाळ पाटील, माजी उपसरपंच अनंत पाटील, दिनकर पाटील, देवानंद पाटील, दयानंद पाटील, युवराज पाटील, संदेश पाटील, रविंद्र म्हात्रे, अरूण पाटील, संदिप पाटील, प्रदिप पाटील, धमेंद्र म्हात्रे, कैलास म्हात्रे, जयेश म्हात्रे, गणेश म्हात्रे, अरूण म्हात्रे, प्रभुदास पाटील, विलास पाटील यांनी विशेष मेहनत घेतली.

Check Also

सर्वांत मोठ्या दिवाळी अंक स्पर्धेचे शनिवारी पारितोषिक वितरण

पनवेल : रामप्रहर वृत्त शैक्षणिक, सामाजिक, वैद्यकीय, कला, क्रीडा, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य …

Leave a Reply