खोपोली : प्रतिनिधी
भारतीय जनता पक्षाच्या खोपोली शहर व्यापारी सेल तर्फे बाजारपेठेत पाणपोई उभारण्यात आली आहे. या पाणपोईचे लोकार्पण माजी आमदार तथा भाजपचे ज्येष्ठ नेते देवेंद्र साटम यांच्या हस्ते करण्यात आले. खोपोली बाजारपेठेत खरेदीसाठी परिसरातील खेडेगावातून आलेल्या ग्रामस्थांना पिण्याची पाण्याची सोय नव्हती. भाजपच्या वतीने व्यापारी सेलचे कीर्ती ओसवाल यांच्या सहयोगाने खोपोली शहरात पाणपोई उभारण्यात आली आहे. खोपोली बाजारपेठेत गर्दीच्या ठिकाणी पाणपोईची व्यवस्था करून भाजप व्यापारी सेलने विधायक कार्य केल्याचे देवेंद्र साटम यांनी या वेळी सांगितले. या पाणपोईच्या लोकार्पणावेळी कीर्ती ओसवाल यांनी उपस्थितांचे स्वागत केले. भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष श्रीकांत पुरी, शहर अध्यक्ष इंदरमल खंडेलवाल, सरचिटणीस हेमंत नांदे, शहर कोषाध्यक्ष राकेश दाबके, कामगार सेल सहसंयोजक सूर्यकांत देशमुख, महिला मोर्चाच्या स्नेहल सावंत, ओबीसी सेलचे शहराध्यक्ष सुनील नांदे, सचिन मोरे, खोपोली बाजारपेठ व्यापारी संघटनेचे अध्यक्ष कांतीशेठ पोरवाल, पदाधिकारी हस्तीमल ओसवाल, सुभाष पोरवाल यांच्यासह व्यापारी व भाजप कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.