Breaking News

‘आरईएक्स‘ च्या माध्यमातून युवकांना दिशा देण्यासाठी एक चांगले व्यासपीठ -आमदार निरंजन डावखरे

रोहे ः प्रतिनिधी

‘आरईएक्स 2 के 19‘ या प्रदर्शनात विद्यार्थ्यानी चांगल्या कलाकृती मांडल्यामुळे त्यांना व्यासपिठ मिळाले आहे. त्यामुळे हे प्रदर्शन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना दिशा देण्यासाठी चांगले व्यासपिठ ठरले असल्याचे मत आमदार निरंजन डावखरे यांनी येथे व्यक्त केले.  रायगड जिल्हा भाजप युवा मोर्चा आणि सुराज्य सामाजिक प्रतिष्ठाण यांच्या संयुक्त विद्यमाने रोह्यातील डॉ. चिंतामणराव देशमुख शहर सभागृहासमोरील पटांगणात आरईएक्स 2 के 19 या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनात विविध अभियंत्रीकी महाविद्यालये, कृषी महाविद्यालये व विद्यालयातील विद्यार्थ्यांनी चलप्रतिकृती व विज्ञान प्रतिकृती सादर केल्या होत्या.   त्याच्या बक्षिस वितरण समारंभात आमदार डावखरे बोलत होते. सुराज्य सामाजिक प्रतिष्ठणचे रोशन चाफेकर यांनी प्रास्ताविक केले. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली व सतिष धारप यांच्या मार्गदर्शनाखाली भरविण्यात आलेल्या या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला होता, अशी माहिती भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अमित घाग यांनी दिली. भाजपचे  जिल्हा उपाध्यक्ष सतिष धारप यांचेही यावेळी भाषण झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतिक राक्षे केले. महाराष्ट्रातील विविध महाविद्यालयानी या प्रदर्शनात कलाकृती मांडल्या होत्या. यातील वेगवेगळया विभागातील उत्कृष्ठ कलाकृतींना मान्यवरांच्या हस्ते बक्षिस देण्यात आली.  रोहा तालुका समन्वय समिती अध्यक्ष संजय कोनकर, भाजपचे अलिबाग-मुरूड विधानसभा मतदार संघ अध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहीते, युवा नेते वैकुंठ पाटील,  जिल्हा सरचिटणीस राजेश मापारा, निखील चव्हाण, नरेश कोकरे, सुदर्शन गावडे, दिपक भगत, हजीमलंग कोठारी, मयुर धनावडे, किरण कनावडे यांच्यासह प्रदर्शनातील सहभागी स्पर्धक उपस्थित होते.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाचा पीआरपीकडून निर्धार

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना चौथ्यांदा विजयी …

Leave a Reply