Breaking News

निवडणुकीसाठी कर्मचार्यांना प्रशिक्षण

अलिबाग : जिमाका

रायगड जिल्ह्यातील सर्व निवडणूक अधिकारी व कर्मचार्‍यांनी निवडणुकीचे काम पारदर्शक, नियोजनबध्द व निःपक्षपातीपणे करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी बुधवारी (दि. 25) येथे दिले. अलिबागमधील पीएनपी नाट्यगृहात बुधवारी सर्व निवडणूक अधिकारी व कर्मचार्‍यांसाठी विधानसभा निवडणूक प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यात डॉ. सूर्यवंशी मार्गदर्शन करीत होते. निवडणूक अधिकारी, कर्मचार्‍यांनी निवडणूक काळात आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक असून, उल्लंघन करणार्‍यांवर कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी या वेळी सांगितले. निवडणुकीसंदर्भातील सर्व समिती प्रमुख व सदस्यांना आवश्यक त्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. सर्व समिती प्रमुखांनी आपल्या सदस्यांकडून चांगले काम करून घ्यावे. निवडणूक प्रचार काळात सर्व समित्यांनी आपापल्या दिलेल्या सर्व जबाबदार्‍या व्यवस्थित व प्रामाणिकपणे पार पाडाव्यात. व्हिडीओ पाहणी पथक, व्हिडीओ सर्वेक्षण पथक व भरारी पथक यांनी आपली जबाबदारी पार पाडताना विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे. आदर्श आचारसंहितेवर नियंत्रण ठेवण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने लतळसळश्र हे मोबाइल अ‍ॅप विकसित केले आहे. त्याचा योग्य तो वापर करावा, अशा सूचना डॉ. सूर्यवंशी यांनी या वेळी केल्या. या प्रशिक्षण कार्यक्रमात एक खिडकी योजना, व्हिडीओ सर्वेक्षण पथक, व्हिडीओ पाहणी पथक, भरारी पथक, स्थिर सर्वेक्षण पथक, लेखांकन टीम, बँक खाते, लेख्यातील त्रुटी, खर्च निरीक्षक व त्यांचे अहवाल, निरीक्षकांची कामे व भूमिका, लतळसळश्र, प्रसारमाध्यमे प्रमाणीकरण व आदर्श आचारसंहिता अंमलबजावणी आदी समित्यांना प्रशिक्षण देण्यात आले. निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. पद्मश्री बैनाडे यांच्यासह विविध समिती प्रमुख व सदस्य या निवडणूक प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी झाले होते.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply