Breaking News

‘कर्मवीरांचे शैक्षणिक योगदान मोलाचे’ रिटघर विद्यालयात जयंती साजरी; मान्यवरांची उपस्थिती

पनवेल ः रामप्रहर वृत्त

कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शाळा काढल्या. त्यामुळे गरिबांची मुले शिकली. शिक्षण क्षेत्रातील कर्मवीरांचे योगदान मोलाचे आहे. त्यांच्या शैक्षणिक कार्यामुळेच आज महाराष्ट्रातील अनेक पिढ्या घडल्या आहेत, असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी व्यक्त केले.

शुक्रवारी श्री भैरवदेव विद्यालय व लोकनेते रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालय-रिटघर येथे पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांचा 132वा जयंती सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते कर्मवीरांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या वेळी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका बी. एस. नाईक यांनी कार्यक्रमाचे

प्रास्ताविक केले.

विविध स्पर्धांमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना, तसेच मागील वर्षी वर्गात प्रथम व द्वितीय आलेल्या विद्यार्थ्यांना आणि इयत्ता दहावी व बारावीच्या शिक्षकांना बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात आले. या वेळी विद्यार्थ्यांची भाषणे झाली. कार्यक्रमाच्या शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्ष लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. नूतन इमारतीचे व रांगोळी प्रदर्शनाचे उद्घाटन विद्यालयाच्या मुख्याध्यापिका बी. एस. नाईक यांच्या हस्ते झाले. सूत्रसंचालन श्रीमती माळी यांनी केले व आभार शेळके यांनी मानले.

Check Also

पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …

Leave a Reply