Breaking News

अलिबागेत बाळशास्त्री जांभेकर जयंती

अलिबाग : प्रतिनिधी

दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघ आणि प्रेस क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (दि. 20) आदरांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष नागेश कुळकर्णी, ज्येष्ठ पत्रकार बळवंत वालेकर, रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष भारत रांजणकर यांच्या हस्ते बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली अर्पण करण्यात आली.

ज्येष्ठ पत्रकार नारायण मेकडे यांच्या निधनाबद्दल या वेळी त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. बळवंत वालेकर, नागेश कुळकर्णी यांनी स्व. मेकडे यांच्या आठवणींना उजाळा दिला. नगरसेवक उमेश पवार, महेंद्र दुसार, माजी नगरसेवक आर. के. घरत, अलिबाग प्रेस असोसिएशनचे कार्याध्यक्ष प्रमोद जाधव, सरचिटणीस समीर मालोदे, उल्हास पवार, हेमकांत सोनार या वेळी उपस्थित होते.

Check Also

नवी मुंबई ग्लोबल बिझनेस समिटला आमदार प्रशांत ठाकूर यांची भेट व शुभेच्छा

नवी मुंबई : रामप्रहर वृत्तनवीन मुंबईतील यू बिझनेस मीटच्या वतीने नवी मुंबई ग्लोबल बिझनेस समिट …

Leave a Reply