Breaking News

काँग्रेसचे शहराध्यक्ष भाजपत

खारघर ः रामप्रहर वृत्त

भारतीय जनता पक्षात पक्षप्रवेश करणार्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्याअंतर्गत शुक्रवारी काँग्रेसचे खारघर शहर अध्यक्ष नितीन भगत, सरचिटणीस बाळकृष्ण पाटील, युवा काँग्रेस उपाध्यक्ष वैभव भगत, गितांजली भगत, प्रमोद भगत, ज्योत्स्ना भगत यांनी भाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला. प्रवेशकर्त्यांचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी पक्षात स्वागत केले. या पक्ष प्रवेशवेळी पनवेल तालुका संघटक प्रभाकर जोशी, नगरसेवक नरेश ठाकूर, नगरसेविका अनिता पाटील, खारघर भाजप प्रसिद्धी प्रमुख गुरुनाथ म्हात्रे, शहर उपाध्यक्ष सुरेश ठाकूर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

Check Also

पनवेल मनपा प्रभाग समित्यांवर भाजप महायुतीचे चारही उमेदवार विजयी

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका प्रभाग समित्यांच्या सभापतिपदाची निवडणूक मंगळवारी (दि.११) पार पडली. या निवडणुकीत …

Leave a Reply