पनवेल ः रामप्रहर वृत्त
पनवेल मतदारसंघात शेतकरी कामगार पक्षाचे अनेक पदाधिकारी शेकाप सोडून भारतीय जनता पार्टीत प्रवेश करत आहेत. मोर्बे येथील शेकापच्या कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये रविवारी जसखार येथे पक्षप्रवेश केला. त्यानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकर यांनी प्रवेशकर्त्यांचे स्वागत केले.
शेकापचे कार्यकर्ते सुरेश दाभणे, प्रभाकर दाभणे, सुरज दाभणे, वासुदेव दाभणे यांनी भाजप मध्ये जाहीर पक्षप्रवेश केला. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या निवासस्थानी झालेल्या या पक्षप्रवेशावेळी पालीदेवद सुकापूरचे माजी सरपंच एकनाथ भोपी, के. ए. म्हात्रे, महादेव गडगे, बाळाराम उसाटकर, रामदास फडके, जर्नादन भगत, रामदास म्हात्रे, राजेश फडके, सचिन फडके, एकनाथ नाईक यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.