खारघर ः रामप्रहर वृत्त
पनवेल विधानसभा मतदारसंघात सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून गेली 10 वर्षे हजारो कोटींची विकासकामे करण्यात आली आहेत. याच विकासकामांवर प्रभावित होऊन खारघर येथील शेकापच्या असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी भाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला.
खारघर येथे झालेल्या या पक्षप्रवेशावेळी शेकापच्या खारघरच्या माजी सरपंच सिद्धी घरत, माजी उपसरपंच संजय घरत, माजी सदस्य आशीष भोईर, लालब्रिगेड अध्यक्ष यतिन बारशे, सेक्टर 4चे अध्यक्ष अजय भोईर, सेक्टर 7 चे अध्यक्ष अक्षय पाटील, प्रभाग 5 चे जनसंपर्क प्रमुख एस. के. डोळस, ज्येष्ठ कार्यकर्ते शंकर म्हात्रे, अनिल म्हात्रे, काळूराम डोळस यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जाहीर पक्षप्रवेश केला. या पक्षप्रवेशावेळी भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, पनवेल महापालिका स्थायी समिती सभापती प्रवीण पाटील, खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, प्रभाग समिती अ चे अध्यक्ष शत्रुघ्न काकडे, नगरसेवक अभिमन्यू पाटील, नरेश ठाकूर, भाजप नेते रघुनाथ ठाकूर, पनवेल तालुका संघटक प्रभाकर जोशी, सांस्कृतिक सेलचे कीर्ती नवघरे, विजय पाटील, कुंदा मेंगडे, दीपक शिंदे, युवा नेते समीर कदम, गुरुनाथ म्हात्रे, साधना पवार, विनोद ठाकूर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. या वेळी उपस्थित मान्यवरांनी प्रवेशकर्त्यांचे स्वागत केले.