नवी दिल्ली : भाजपचे एक वरिष्ठ नेते आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका पदाधिकार्याच्या हत्येच्या प्रकरणात वाँटेड असलेल्या हिज्बुल मुजाहिदीनच्या प्रमुख कमांडरचा सुरक्षा दलाने रामबन जिल्ह्यातील चकमकीत खात्मा केला. ओसामा आणि त्याचे सहकारी जाहिद आणि फारुख अशी या चकमकीत ठार झालेल्या तीन दहशतवाद्यांची नावे आहेत. जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात शनिवारी ही चकमक सुमारे नऊ तास सुरू होती. एकूण तीन दहशतवादी या चकमकीत ठार झाले, तर सैन्याचा एक जवान शहीद झाला. अधिकार्यांनी सांगितले की, या तिन्ही अतिरेक्यांनी शनिवारी सकाळी राजमार्गाजवळ चकमक झाल्यानंतर पळ काढला आणि ते मुख्य बाजारातील एका घरात घुसले. तेथेच सैन्य दलाने तिघांना मारले.
Check Also
तळोजा मजकूरमध्ये शिवरायांच्या मंदिराचा वर्धापन दिन
तळोजा : रामप्रहर वृत्ततळोजा मजकूर येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज मंदिराचा पहिला वर्धापन दिन रविवारी …