Breaking News

क्रीडा स्पर्धेत पनवेलचे शासकीय अध्यापक महाविद्यालय सर्वोत्कृष्ट

पनवेल : रामप्रहर वृत्त

नवी मुंबई व रायगड जिल्हा अध्यापक महाविद्यालय क्रीडा संघातर्फे New Mumbai and Raigad District Teacher’s Traning College’s Sports Association दरवर्षीप्रमाणे बीएड छात्राध्यापकांसाठी दोन दिवसीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन दि. 1 आणि 2 फेब्रुवारीला करण्यात आले होते. स्पर्धांचे आयोजक ऐरोलीच्या मांजरा एज्युकेशन ट्रस्टचे कॉलेज ऑफ एज्युकेशन अ‍ॅण्ड रिसर्च हे होते. या स्पर्धांत सात शिक्षणशास्त्र महाविद्यालयांनी सहभाग घेतला होता. 100 मी. व 200 मी. धावणे, रिले, बुद्धिबळ, कॅरम, गोळाफेक, भालाफेक, डिस्क थ्रो, चमचा गोटी, पुस्तक संतुलन, पोते स्पर्धा, बॅडमिंटन इ. वैयक्तिक, तर थ्रो बॉल, व्हॉलीबॉल, खो-खो व टग ऑफ वॉर इ. सांघिक प्रकारांत स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धांत शासकीय अध्यापक महाविद्यालय पनवेलच्या विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश संपादन केले. शासकीय अध्यापक महाविद्यालयाच्या क्रीडा प्रशिक्षक डॉ. नीलिमा मोरे यांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यानिमित्त विविध क्षेत्रांतील प्रगतीमध्ये खेळातील उत्कृष्टतेचा आणखी एक मानाचा तुरा रोवण्यात आला आहे.

Check Also

आमदार महेश बालदींच्या उपस्थितीत विविध पक्षांतील कार्यकर्ते भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त आमदार महेश बालदी यांचे सक्षम नेतृत्व मान्य करून व विकासात्मक धोरणावर …

Leave a Reply