जेएनपीटी : प्रतिनिधी
उरण-अलिबाग येथील नागरिकांना, चाकरमान्यांना करंजा-रेवस जलमार्गाने प्रवास करणार्यांसाठी आत्ता मेरीटाईम बोर्डाने एक लहान बोट उपलब्ध करून दिल्याने प्रवाशांना सोयीचे झाले आहे. या बोटीमध्ये 10 प्रवाशांना बसण्याची क्षमता असून 18 ते 20 मिनिटात ती बोट करंजा येथून रेवसला पोहचते.
अलिबाग व उरण या दोन तालुक्यातील प्रवाशांना सोयीचे व्हावे यासाठी मेरिटाईम बोर्डातर्फे रेवस ते करंजा येथे तर सेवा सुरू आहे. दर तासाला येथे असते. यासाठी 20 रूपये प्रवास भाडे आहे.
अलिबाग हे जिल्ह्याचे ठिकाण असल्यामुळे न्यायालयीन कामानिमित्त व शासकीय कामानिमित्त व उरण तालुक्यात नोकरीनिमित्ताने अलिबाग येथून येणारे हजारो प्रवासी या जलमार्गाने प्रवास करीत असतात. मात्र काही वेळेस प्रवाशांची तर चुकल्यानंतर त्यांना तासभर ताटकळत रहावे लागत असे. मात्र ही बोट उपलब्ध झाल्याने अशा तर चुकलेल्या प्रवाशांना त्याचा फायदा होणार आहे. प्रवाशांची होणारी गैरसोय पाहता महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाकडून दहा आसनी लहान बोट सुरू करण्यात आली आहे. यामुळे आता प्रवाशांना ताटकळत बसावे लागणार नाही.
राहुल धायगुडे, (मेरीटाईम बोर्ड बंदर निरीक्षक, करंजा)-ही सेवा नव्यानेच सुरू करण्यात आली असून या बोटीची क्षमता 10 प्रवासी अशी आहे. तसेच प्रवाशांना नेहमीची बोट चुकल्यानंतर या बोटीचा वापर करता येत असून पुढील काळात जादा प्रवासी क्षमता असलेल्या बोटी करंजा बंदरात येणार आहेत.