उरण : प्रतिनिधी – न्हावे ग्रामपंचायतीच्या वतीने 85 ग्रामस्थांना शनिवारी (दि. 11) न्हावाशेवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत सरपंच जितेंद्र म्हात्रे यांच्या हस्ते धान्याचे वाटप करण्यात आले.
कोरोनाच्या संचारबंदी, लॉकडाऊन दरम्यानच्या पार्श्वभूमीवर न्हावा येथील रयत शिक्षण संस्थेच्या हायस्कूलजवळ ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले. यामध्ये पाच किलो तांदूळ, पाच किलो गहू, किलो तूरडाळ, एक किलो वटाणे, एक किलो गोडेतेल, एक किलो साखर, दोन किलो कांदे, दोन किलो बटाटे, 250 ग्रॅम प्रमाणे लसुण, हळद, मसाले, चहा पावडर, गरम मसाला अशा जीवनावश्यक वस्तूंंचा समावेश होता.
या वेळी उपसरपंच किसन पाटील, ग्राम सुधारणा मंडळांचे अध्यक्ष आशिष पाटील, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष प्रदीप ठाकूर, ग्रामपंचायत सदस्य हरिश्चंद्र म्हात्रे, प्रल्हाद पाटील, देवेंद्र भोईर, सदस्या निर्मला ठाकूर, अमृता पाटील, कल्पना घरत, विजया ठाकूर, मंजुषा ठाकूर व साधना तांडेल आदी उपस्थित होते.