Breaking News

सांगली आणि नाशिकला परतीच्या पावसाने झोडपले

नाशिक, सांगली : प्रतिनिधी

नाशिक, सांगलीसह राज्यातील इतर भागाला परतीच्या पावसाने झोडपले आहे. सांगली जिल्ह्याच्या पूर्वेकडील दुष्काळी भागात शनिवारी रात्री मुसळधार पाऊस झाला, तर नाशिकमध्ये रविवारी (दि. 6) ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली.

नाशिकमध्ये कालिका देवीच्या यात्रेनिमित्त जमलेले भाविक आणि तेथील विक्रेत्यांची पावसामुळे तारांबळ उडाली. रविवार असल्याने हजारो भाविक कालिका देवीच्या दर्शनासाठी जमले होते. दरम्यान, पुढील तीन दिवस नाशकात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

दुसरीकडे सांगलीत पूर्वेकडील दुष्काळी भागात शनिवारी रात्री पावसाने जोरदार हजेरी लावली. तासगाव तालुक्याच्या पूर्व आणि कवठेमहांकाळ तालुक्याच्या पश्चिम भागाला पावसाने झोडपले. या पावसाने दुष्काळी भागातील नागरिकांची पाण्याची चिंता काहीशी मिटली आहे. दरम्यान, कवठेमहांकाळ तालुक्यात मोरगाव येथील अग्रणी नदीच्या पुलावरून योगेश पवार व त्याची सहा वर्षांची मुलगी श्रेया पवार दुचाकीसह वाहून गेली. (बाप-लेक गेले वाहून/सविस्तर वृत्त पान 2 वर..)

जालन्यात वीज पडून तिघांचा मृत्यू जालना : सावरगाव भागडे या गावात वादळी वार्‍यासह झालेल्या पावसात वीज पडून तिघांचा मृत्यू झाला, तर दोन जण जखमी झाले आहेत. गयाबाई गजानन नाईकनवरे (35), संदीप शंकर पवार (30) आणि मंदाबाई नागोराव चाफळे (35) अशी मयतांची नावे आहेत. (सविस्तर वृत्त पान 2 वर..)

Check Also

आमदार महेश बालदी 29 ऑक्टोबर रोजी दाखल करणार अर्ज

उरण : रामप्रहर वृत्त उरण विधानसभा मतदारसंघातून भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय व मित्रपक्ष युतीचे …

Leave a Reply