नवी मुंबई : प्रतिनिधी
घणसोलीतील सिम्फ्लेक्स वसाहतीत राहाणार्या एका तरुणाने राहत्या घरात आपल्या प्रेयसीसोबत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. दत्तात्रय वरे (24) आणि साक्षी गोळे (19, रा. कोपरखैरणे) अशी या दोघांची नावे असून, त्यांच्या आत्महत्येमागचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
दत्तात्रय वरे हा माथाडी कामगार म्हणून काम करीत होता, तर साक्षी खासगी कंपनीत कामाला जात होती. या दोघांचा साखरपुडा झाला होता. त्यामुळे हे दोघे लवकरच विवाहबंधनात अडकणार होते. त्यांच्या आत्महत्येप्रकरणी रबाळे पोलीस अधिक तपास करीत आहेत.