पनवेल : बातमीदार
यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी अर्थात यशदा, बाणेर पुणे यांच्या सहयोगाने व त्यांच्या प्रति कर्मचारी रूपये 275 अनुदानातून 20 व 21 डिसेंबर या दोन दिवसांसाठी पनवेल महानगरपालिकेत माहिती अधिकार कायदा या विषयी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. पनवेल महानगरपालिका ही नव्याने स्थापन झालेली असून येथे पूर्वाश्रमीचे नगरपरिषद व ग्रामपंचायत कर्मचारी कार्यरत आहेत. तसेच अनेक कंत्राटी कर्मचारी कार्यरत आहेत. यातील अनेकांना या कायद्याविषयी अद्ययावत माहिती नसल्याने तांत्रिक अडचणी येतात. ही बाब लक्षात घेऊन प्रत्येकी 50 असे 100 अधिकारी व कर्मचारी यांना प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. नाट्यगृहाच्या तिसर्या मजल्यावर प्रदर्शन केंद्रात हेे प्रशिक्षण सुरू आहे.