पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्ष, शिवसेना, आरपीआय व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रचारार्थ बुधवारी (दि. 9) पनवेल तालुक्यात दौरा होणार आहे.
सकाळी 10 वाजता धानसर, 11 वाजता किरवली, 11.30 वाजता धरणा, दुपारी 12 वाजता धरणा कॅम्प, 1 वाजता रोहिंजण, 2 वाजता पिसार्वे, 3 वाजता तुर्भे, 3.30 वाजता करवले, सायंकाळी 4.30 वाजता तळोजा मजकूर, 5.30 वाजता पेठाली, 6 वाजता पाचनंद, 7 वाजता पापडीचापाडा, 7.30 वाजता खुटारी, रात्री 8.15 वाजता ओवे या ठिकाणी, तसेच सकाळी 10 ते दुपारी 2 आणि सायंकाळी 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत प्रभाग क्रमांक 20मधील मोराज कॉलनी व परिसरात प्रचार दौरा होणार आहे.
या प्रचार दौर्यात स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन महायुतीच्या वतीने भाजप तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी केले आहे.