Breaking News

ज्युनियर राज्यस्तरीय तायक्वॉन्डो स्पर्धेसाठी रायगडचा संघ जाहीर

पनवेल : रामप्रहर वृत्त

रायगड तायक्वॉन्डो असोसिएशचे सचिव व प्रमुख प्रशिक्षक सुभाष पाटील यांनी 24 ते 26 जूनदरत्यान जिल्हा क्रीडा संकुल रत्नागिरी येथे होणार्‍या राज्यस्तरीय ज्युनिअर तायक्वॉन्डो स्पर्धेसाठी रायगडचा संघ जाहीर केला.
यामध्ये क्युरोगी प्रकार मुले ः अभिषेक चव्हाण (45 किलोखालील), शाकीर अली खान (48 किलोखालील), व्यंकटेश गणेसन (51 किलोखालील), हर्ष शिर्के (55 किलोखालील), आदर्श कोकिटकर (59 किलोखालील), ओम तेलंगे (63 किलोखालील), गणेश फुलारी (68 किलोखालील), पूर्वेश म्हात्रे (78 किलोवरील) तर मुलींमध्ये प्रवत्रा कदम (42 किलोखालील), भाविका शहासने (44 किलोखालील), तनिष्का मुसले (46 किलोखालील), यश्वी लोधी (49 किलोखालील), अनन्या चितळे (52 किलोखालील), पल्लवी म्हात्रे (55 किलोखालील), कार्थीका नारायणन (59 किलोखालील), तनुजा पाटील (68 किलोखालील), निर्मिती दत्त (68 किलोवरील) यांचा समावेश आहे.
पुमसे प्रकार वैयक्तिक मुलांमध्ये पुर्वेश म्हात्रे, मुलींमध्ये रतीका अहुजा, जोडी मुले व मुली दक्ष भोईर व हंसिनी पाटील, ग्रुप मुले अभिषेक चव्हाण, ओमकार जोडे, दक्ष भोईर, ग्रुप मुली रतीका अहुजा, कार्थीका नारायणन, गायत्री भंडारे यांचा समावेश आहे. संघ प्रशिक्षक म्हणून राकेश जाधव, अक्षदा भगत, मच्छिंद्र मुंडे हे काम पाहणार आहेत. संघ व्यवस्थापक अनिल म्हात्रे आहेत.
रत्नागिरी येथे होणार्‍या तायक्वॉन्डो स्पर्धेतील सुवर्ण पदक विजेते खेळाडू कर्नाटक येथे होणार्‍या राष्ट्रीय ज्युनियर तायक्वॉन्डो स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतील, असे सुभाष पाटील यांनी सांगितले.

Check Also

खांदा कॉलनीतील सीकेटी महाविद्यालयात 4 ऑगस्टला मोफत आरोग्य तपासणी आणि औषधोपचार महाशिबिर

पनवेल : रामप्रहर वृत्त अखंडपणे समाजोपयोगी उपक्रमे राबविणारे श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल, …

Leave a Reply