Breaking News

खारघरमध्ये भाजपचा झंझावात

पनवेल : रामप्रहर वृत्त

पनवेल विधानसभा मतदारसंघातून सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाची हॅट्ट्रिक साधण्यासाठी पदाधिकारी आणि कार्यकर्ते सज्ज झाले आहेत. त्या अनुषंगाने खारघर विभागात सोमवारी (दि. 7) भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत आणि सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला.

या वेळी पनवेल महापालिकेचे स्थायी समिती सभापती प्रवीण पाटील, महिला व बालकल्याण सभापती लीना गरड, प्रभाग समिती ‘अ’चे अध्यक्ष शत्रुघ्न काकडे, नगरसेवक अभिमन्यू पाटील, रामजी बेरा, नरेश ठाकूर, निलेश बावीस्कर, नरगरसेविका नेत्रा पाटील, अनिता पाटील, आरती नवघरे, हर्षदा उपाध्याय, भाजपचे खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, अमर उपाध्याय, लखबीर सैनी, समीर कदम, सरचिटणीस दीपक शिंदे, प्रमोद म्हात्रे, विपूल चौटालिया, गीता चौधरी आदी पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

खारघरमध्ये नाट्यगृह उभारणीकरिता भूखंड द्या

आमदार प्रशांत ठाकूर यांची सिडकोकडे आग्रही मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त एज्युकेशनल हब असलेल्या खारघरमध्ये …

Leave a Reply