Monday , October 2 2023
Breaking News

मूंछे हो तो अभिनंदन जैसी

‘अभिनंदन’ स्टाईलची तरुणांत क्रेझ

बंगळूरू ः विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्या शौर्याला सलाम करण्यासाठी त्यांच्या स्टाईलची तरुणांमध्ये क्रेझ निर्माण झाली आहे. भारताचा लढवय्या जवान विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्या शौर्याचे सध्या सगळीकडे कौतुक सुरू आहे. त्यांना मानणाऱा मोठा चाहता वर्गही तयार झाला आहे. त्याचबरोबर त्यांच्या व्यक्तीमत्त्वाला भारदस्तपणा देणारी त्यांची मिशीही तरुणांमध्ये अल्पावधीतच लोकप्रिय झाली आहे.

अभिनंदन यांचे शहर बंगळूरूतील काही तरुणांनी त्यांच्या स्टाईलच्या मिशा ठेवल्या आहेत. याद्वारे त्यांनी त्यांच्या शौर्याला अनोख्या पद्धतीने जणू सलामच ठोकला आहे. अभिनंदन यांच्या मिशांची सध्या नेटकर्‍यांमध्ये आणि कट्ट्यांवरही चर्चा सुरू आहे. शनिवारी बंगळूरूतील एका तरुणाने आपल्या जवळच्या सलूनमध्ये जाऊन आपल्याला अभिनंदन लूक ठेवायचा असल्याचे सांगत तसा लूक करून घेतला. अभिनंदन हे देशाचे बहादूर जवान असून त्यांच्या मिशा या शौर्याचे प्रतीक आहे. या सलूनचे मालक समीर खान म्हणाले की, आमच्याकडून जवळपास 15 तरुणांनी अभिनंदन यांच्याप्रमाणे आपल्या मिशा ट्रिम करून घेतल्या आहेत. तरुण अशा प्रकारे आपल्या जवानाची स्टाईल कॉपी करीत आहेत, याचा आपल्याला अभिमान वाटत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर अभिनंदनचा एक निस्सिम चाहता बनलेल्या अब्बास मस्तानने म्हटले की, मिशीचा असा लूक ठेवून आम्ही आपल्या हवाई दलाला आपला पाठिंबा दर्शवत आहोत.विशेष म्हणजे काही सलूनमध्ये तर अभिनंदन यांच्या स्टाईलमध्ये मिशी ठेवण्यासाठी 50 टक्के सूटही जाहीर करण्यात आली आहे, तर एका सलूनच्या व्यवस्थापकाने सांगितले की, त्यांच्या सलूनमध्ये तरुणांना असा लूक मोफत करून दिला जात आहे.

बाळाचं नाव ठेवलं ‘अभिनंदन’

भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन यांची पाकिस्तानातून सुटका झाली, त्याचवेळी एका विवाहितेने गोंडस बाळाला जन्म दिला.  राजस्थानातील अल्वर जिल्ह्यात शुक्रवारी सायंकाळी जन्माला आलेल्या बालकाचे नाव पाकिस्तानातून सुखरुप परतलेले भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्या नावावरून ‘अभिनंदन’ असे ठेवण्यात आले आहे. बाळाचे आजोबा जनेश भुतानी यांनी सांगितले की, माझ्या सुनेला शुक्रवारी संध्याकाळी पुत्ररत्न झाला. त्याच वेळी पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारतीय वैमानिक अभिनंदन यांची सुटका करण्यात आली. त्यांचा आम्हाला अभिमान वाटतो. त्यामुळे मुलाचे नाव आम्ही अभिनंदन असे ठेवले आहे. यावेळी सुनेसह सर्वच जण दूरचित्रवाणीवर विंग कमांडर वर्धमान यांच्याविषयीच्या बातम्या बघत होते. नंतर सुनेला प्रसव वेदना सुरू झाल्या.

Check Also

 लोकनेते दि.बा.पाटील नामकरण कृती समितीतर्फे सर्व आजी माजी आमदारांची लवकरच बैठक

पनवेल : प्रतिनिधी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव देण्याचा विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात …

Leave a Reply