Breaking News

चिर्ले येथे वन्यजीव सप्ताह साजरा

उरण ः वार्ताहर

जागतिक वन्यजीव सप्ताहाच्या अनुषंगाने उरण तालुक्यातील चिर्ले येथे वन्यजीव निसर्ग संरक्षण संस्था आणि वनखाते यांच्या संयुक्त विद्यमाने वन्यजीव सप्ताह उत्साहात साजरा करण्यात आला.

निसर्ग संतुलन राखण्यासाठी वन्यजीवांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. वन्यजीव वाचवा निसर्ग वाचवा हा मंत्र घेऊन वन्यजीव निसर्ग संरक्षण संस्था कार्यरत आहे. वन्यजीवांच्या होणार्‍या बेसुमार हत्या रोखण्यासाठी या संस्थेने योगदान दिले असून वनखात्याच्या सहकार्याने वन्यजीवांचे संवर्धन करण्याचे कार्य त्यांनी अविरत चालू ठेवले आहे. याबाबत समाजात जनजागृती करण्यासाठी चिर्ले येथील रायगड जिल्हा परिषद शाळेत वन्यजीव सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी उरण क्षेत्रीय वनअधिकारी शशांक कदम यांनी वन्यजीव संवर्धनाबाबत मार्गदर्शन केले. वन्यजीव निसर्ग संरक्षण संस्थेचे उपाध्यक्ष आनंद मढवी, निसर्गमित्र महेश भोईर यांनीही मार्गदर्शन केले.

कार्यक्रमास वनखात्याचे डी. डी. पाटील, वनक्षेत्र रक्षक देवकर, मिलिंद भोईर, सूरदास धांडे, माया भोसले, चिर्ले तंटामुक्ती अध्यक्ष हिराजी मढवी, ग्रामपंचायत सदस्य आकाश घरत, माजी सरपंच एन. डी. पाटील, सामाजिक कार्यकर्ते सूर्यकांत म्हात्रे, वन्यजीव निसर्ग संरक्षण संस्थेचे अध्यक्ष विवेक केणी, दिलीप मढवी, कैलास मढवी, पंकज घरत, सुमित मढवी, नितीन मढवी, विनित मढवी, बाबुराव पाटील, प्रमोद मढवी, अभय मढवी, संतोष मढवी, धर्मेंद्र मढवी, दैवत ठाकूर, दत्तात्रेय मढवी, सुनील पाटील, नामदेव मढवी, बाबू मढवी, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply