Friday , June 9 2023
Breaking News

रामशेठ ठाकूर महाविद्यालयात महिला दिन साजरा

खारघर : रामप्रहर वृत्त

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून खारघर येथे रामशेठ ठाकूर कॉलेजमध्ये जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास सर्व प्राध्यापिका, तसेच सर्व विभागप्रमुख उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष उपप्राचार्य शरदकुमार शहा यांच्या हस्ते प्रतिमापूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. या वेळी शहा यांनी जागतिक महिला दिनानिमित्त संपूर्ण माहिती दिली व महिलांची महती, महत्त्व सांगणारी कविता सादर करून महिलांनी आपली क्षमता ओळखून आपल्यामध्ये असणार्‍या कमतरतेवर विजय मिळवला पाहिजे, तसेच यशाच्या दिशेने वाटचाल कशी करावी याबाबत मार्गदर्शन केले. यानंतर महिला विकास समिती प्रमुख प्रा. नमिता आकुर्री यांनी संतुलित आहार व पोषणमूल्यांचे जीवनातील महत्त्व सांगितले. बी. एम. एस. शाखाप्रमुख प्रा. पद्मप्रिया देवनाथन यांनी सर्वांना मार्गदर्शन दिले. अशाप्रकारे महिला विकास समितीच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला व विशाखा गाईड लाइनतर्फे महिला सुरक्षेची माहिती दिली. या कार्यक्रमासाठी प्राचार्य. डॉ. एस. टी. गडदे यांचे मार्गदर्शन लाभले. महाविद्यालयाचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर व व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख यांनी सर्वांचे कौतुक केले.

Check Also

कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावर शांतता कमिटीची बैठक

पनवेल : वार्ताहर सध्या महाराष्ट्रात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व स्टेटस वायरल होत असल्याने हिंदुत्ववादी …

Leave a Reply