Sunday , February 5 2023
Breaking News

खांदा कॉलनीत जलवाहिनी फुटली

पनवेल : बातमीदार

खांदा कॉलनी सेक्टर सहा परिसरात पाणीपुरवठा करणारी पाइपलाइन शनिवारी रात्री फुटल्याची घटना घडली. एका विकासकाकडून नव्या प्रकल्पासाठी रात्रीच्या वेळी पाणीजोडणी घेत असताना हा प्रकार

घडल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

निष्काळजीपणे रस्ता खोदल्यामुळे हा प्रकार घडला, असे बोलले जात असले तरी नेमके कारण अद्याप कळू शकलेले नाही. मुख्य पाइपलाइनवरून खांदा कॉलनीत अंतर्गत जलवाहिनी आहे. त्यामुळे सेक्टर सहा आणि परिसरात रविवारी पाणीपुरवठ्यात अडथळा निर्माण झाला. सेक्टर सहा येथील एकता सोसायटीच्या समोर हा प्रकार घडला. असाच प्रकार खांदा कॉलनीत मुख्य जलवाहनीच्या ठिकाणीही काही दिवसांपूर्वी घडला होता. पाण्याची चोरी करण्यासाठी रात्रीच्या अंधारात ही पाणीजोडणी घेतली जात असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे. स्थानिक नगरसेवक एकनाथ गायकवाड यांच्याकडे नागरिकांनी तक्रार केली. सोमवारी याबाबतीत सिडकोकडे लेखी अर्ज करून तक्रार करू,

अशी माहिती गायकवाड यांनी दिली.

Check Also

कामोठ्यातील लोकनेते रामशेठ ठाकूर स्कूल आणि ज्युनियर कॉलेजचे स्नेहसंमेलन उत्साहात

पनवेल : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूल …

Leave a Reply