Breaking News

पेंटाग्राफला आग, हार्बर रेल्वे विस्कळीत

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त

हार्बर मार्गावरील वाशी रेल्वेस्थानकात लोकलच्या पेंटाग्राफला आग लागल्यामुळे पनवेलच्या दिशेने जाणारी वाहतूक बुधवारी (दि. 9) विस्कळीत झाली. ट्रेनच्या पेंटाग्राफवर अज्ञाताने बॅग फेकल्याने ही आग लागल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, या घटनेत कोणालाही इजा झाली नसली तरी ऐन गर्दीच्या वेळी हा प्रकार घडल्याने चाकरमान्यांना नाहक त्रास सहन करावा लागला.

वाशी रेल्वेस्थानकात असलेल्या गाडीच्या पेंटाग्राफने अचानक पेट घेतल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. त्यानंतर सर्वत्र धूर पसरल्याने रेल्वेस्थानकात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. रेल्वे कर्मचार्‍यांनी त्वरित ही आग नियंत्रणात आणली आणि गाडी कारशेडमध्ये रवाना केली. या प्रकारामुळे हार्बर मार्गावरील रेल्वेचे वेळापत्रक मात्र कोलमडले. दोन्ही दिशेने जाणार्‍या गाड्या 20 ते 25 मिनिटे उशिराने धावत होत्या.

अज्ञात व्यक्तीने रेल्वेच्या पेंटाग्राफवर बॅग फेकल्याने आग लागल्याची माहिती समोर आली आहे. सध्या पोलीस त्या व्यक्तीचा शोध घेत असून सीसीटीव्ही फुटेजही तपासण्यात येत आहे. अनेकदा घडणार्‍या प्रकारांमुळे सध्या पोलिसांनी रेल्वे मार्गावर गस्त घालण्यास सुरुवात केली आहे. तरीही असे प्रकार सुरूच आहेत.

Check Also

पनवेलमध्ये एसआयआरसंदर्भात बैठक

पनवेल : रामप्रहर वृत्तमतदारयादी विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) अभियानासंदर्भात भाजप पनवेल विधानसभा मतदारसंघाचे बीएलए व …

Leave a Reply