Breaking News

आवरे येथील जिल्हास्तरीय मॅरेथॉनमध्ये

अक्षय जितेकर, ऋतुजा सकपाळ अव्वल

उरण : रामप्रहर वृत्त
एक धाव आरोग्यासाठी, पूर्वजांच्या स्मरणासाठी, हा संदेश देत उरण तालुक्यातील आवरे येथे निगा फाऊंडेशनच्या वतीने कै. सोमा रामा गावंड यांच्या स्मृतीस अभिवादन करीत जिल्हास्तरीय मॅरेथॉन आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेतील खुल्या पुरुष गटात अक्षय जितेकर आणि महिलांमध्ये ऋतुजा सकपाळ यांनी बाजी मारली
आवरे मॅरेथॉनचे यंदाचे सातवे वर्ष होते. स्पर्धेचे उद्घाटन ज्ञान प्रसारक शिक्षण संस्थेचे संस्थापक तथा अध्यक्ष प्राचार्य बाळासाहेब म्हात्रे यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटन समारंभास रोटरी क्लबचे राजू मुंबईकर सर, सरपंच निराबाई पाटील, सारडे विकास मंचचे अध्यक्ष नागेंद्र म्हात्रे, मुकुंद गावंड, रोहित पाटील, संदीप गावंड, माधव म्हात्रे, अनिल घरत, अनिल पाटील, प्रशांत म्हात्रे, जितेंद्र थळी, रामचंद्र म्हात्रे विद्यालयाचे शिक्षकवृंद आदी उपस्थित होते.
सूत्रसंचालन गोवठणे विकास मंचचे अध्यक्ष सुनील वर्तक यांनी केले, तर आभार निगा फाऊंडेशनचे सचिव निवास गावंड यांनी मानले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी फाऊंडेशनचे अध्यक्ष निलेश गावंड तसेच पदाधिकार्‍यांनी परिश्रम घेतले. साईनाथ
पाटील, मुकेश गावंड, मोहन पाटील, मयूर गावंड, राकेश गावंड, दर्शन पटील, ज्ञानेश्वर गावंड यांचेही सहकार्य लाभले.

Check Also

पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …

Leave a Reply