
पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल विधानसभा मतदारसंघात भाजप, शिवसेना, आरपीआय आणि मित्रपक्षांच्या महायुतीचे उमेदवार सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांचा जोरदार प्रचार सुरू आहे. मतदारसंघातील सर्व कार्यकर्ते आमदार प्रशांत ठाकूर यांना एक लाखहून अधिक मतांनी विजयी करण्यासाठी सज्ज झाले आहेत. त्याअंतर्गत भिंगारी विभागात मंगळवारी (दि. 8) जोरदार प्रचार करण्यात आला.
भिंगारी विभागात प्रचार करता वेळी पनवेल महापालिकेच्या माजी उपमहापौर तथा नगरसेविका चारुशीला घरत, प्रभाग समिती ड चे अध्यक्ष तेजस कांडपिळे, नगरसेवक अजय बहिरा, शक्तिकेंद्र प्रमुख रूपेश परदेशी, बुथ केंद्रप्रमुख जगदीश परदेशी, अशोक परदेशी, बी. आर. परदेशी, भिंगारी विभाग सरचिटणीस पंकज डावलेकर, किरण मढवी, जोमा परदेशी, विनोद डावलेकर, बाबू परदेशी, अजिंक्य चव्हाण, राजेश गुप्ता, सुरज परदेशी, अभी लाड, रोहित पवने यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, मान्यवर उपस्थित होते.