रोहे ः प्रतिनिधी रोह्याचे ग्रामदैवत श्री धावीर महाराजांचा पालखी उत्सव सर्वांसाठीच पर्वणी असते. सशस्त्र सलामी पाहण्यासाठी व श्री धावीर महाराजांच्या दर्शनासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात व्यवसाय व कामानिमित्त गेलेले रोहेकर व महाराष्ट्रातील श्री धावीर महाराजांचे तमाम भक्तगण रोह्यात येत असतात. दसर्याच्या दुसर्या दिवशी बुधवारी (दि. 9) रोहेकर श्री धावीर मंदिरात सकाळी जमण्यास सुरुवात झाली. सकाळी 6 वाजता श्री धावीर महाराजांच्या आरतीचा घंटानाद झाला. सगळ्यांचे लक्ष श्री धावीर महाराजांना पोलीस दलाकडून दिल्या जाणार्या सलामीकडे होते. हजारो भक्तगण सलामीचा क्षण टिपण्यासाठी मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर जमल्याने उत्सुकता वाढली होती. अखेर हा सोहळा भाविकांनी डोळ्यांत साठवून ठेवला. (पान 2 वर..)
Check Also
अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा
आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …