पनवेल ः रामप्रहर वृत्त
तालुक्यातील वलप येथील काँग्रेस पक्षातील कार्यकर्त्यांनी बुधवारी (दि. 9) भाजपत प्रवेश केला. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी प्रवेशकर्त्यांचे स्वागत केले. या वेळी भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, भाजप वावंजा पंचायत समिती अध्यक्ष संदीप तांडेल, वारकरी संप्रदाय पनवेल तालुकाध्यक्ष ह.भ.प. हरिदास टेंभे, वावंजा जिल्हा परिषद गट चिटणीस अंकुश पाटील, चंद्रकांत पाटील, प्रतिक पाटील, संजोग पाटील आदी उपस्थित होते. चांगा गणा पाटील, आत्माराम बाबू पाटील, अनंता बाबू पाटील, बळीराम आंबो पाटील, सखाराम आंबो पाटील, भरत आंबो पाटील, विजय सीताराम पाटील, उमेश आत्माराम पाटील, संदेश अनंता पाटील, प्रवीण चांगा पाटील, देवदास चांगा पाटील, मनीष रेवण पाटील, बाळाराम बामा पाटील, जयराज बळीराम पाटील, बबन चिवन्या पाटील, अरुण आंबो पाटील या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. पक्षाची शाल घालून लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी त्यांचे स्वागत केले.