पनवेल ः रामप्रहर वृत्त
पनवेल महापालिका निवडणुक अंतिम टप्प्यात आहेत. त्यानुसार भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, आरपीआय माहयुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्त महाराष्ट्र अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष हाजी अरफात शेख आणि पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी भव्य बाईक रॅली काढण्यात आली होती.
या वेळी महायुतीचे प्रभाग क्रमांक 14चे उमेदवार इकबाल हुसेन काझी, सारिका अतुल भगत, सतीश दत्तात्रेय पाटील, रेणुका मयुरेश नेतकर, प्रभाग क्रमांक 19 चे उमेदवार सुमित झुंझारराव यांच्यासह इतर उमेदवारांचा जोरदार शक्तीप्रदर्शन करत प्रचार करण्यात आला. प्रचारा दरम्यान दिवंगत लोकनेते दि.बा.पाटील यांच्या निवासस्थानी जाऊन महाराष्ट्र अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष हाजी अरफात शेख आणि पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पन करून अभिवादन केले.
या वेळी जिल्हा उपाध्यक्ष मयुरेश नेतकर, माजी नगरसेवक मुकित काजी, प्रभाग क्रमांक 19 चे उमेदवार सुमित झुंजाराव, प्रीतम म्हात्रे, अकबर सय्यद, केदार भगत, यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
Check Also
पनवेल महापालिकेच्या नूतन महापौर निवासस्थानाचे लोकार्पण
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेच्या वतीने खारघर येथील सेक्टर २१मध्ये उभारण्यात आलेल्या ‘शिवनेरी’ या भव्य …
RamPrahar – The Panvel Daily Paper