Monday , October 2 2023
Breaking News

पनवेलमध्ये आता 9 एप्रिलला स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा

पनवेल : रामप्रहर वृत्त
शिवसेना-भाजप युतीतर्फे पनवेल विभागात काढण्यात येणारी स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा 2 एप्रिलऐवजी आता 9 एप्रिल रोजी आयोजित करण्याचे ठरले आहे.
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या स्वातंत्र्यलढ्यातील कामगिरीचे स्मरण करून देण्यासाठी भाजप आणि शिवसेनेतर्फे राज्यभरात 30 मार्चपासून सावरकर गौरव यात्रा काढण्यात येत आहे. त्यानुसार पनवेल परिसरात ही गौरव यात्रा 2 एप्रिलला होणार असल्याची माहिती भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी नुकतीच पत्रकार परिषदेत दिली होती, पण यात्रेची अधिक चांगली तयारी करता यावी याकरिता 2 एप्रिलऐवजी 9 एप्रिलला ही यात्रा पनवेलमध्ये होणार आहे. तारखेत झालेला बदलाचा निर्णय भाजप व शिवसेनेच्या वरिष्ठ पदाधिकार्‍यांनी एकत्रितपणे घेतला आहे. त्यामुळे सर्व पदाधिकार्‍यांनी आयोजनाबाबतच्या बैठका सुरू ठेवून अधिकाधिक चांगले नियोजन करण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Check Also

 लोकनेते दि.बा.पाटील नामकरण कृती समितीतर्फे सर्व आजी माजी आमदारांची लवकरच बैठक

पनवेल : प्रतिनिधी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव देण्याचा विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात …

Leave a Reply