Breaking News

खालापुरात आरोग्य तपासणी शिबिर

खोपोली : प्रतिनिधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून बुधवारी भाजपच्या खालापूर तालुका मंडळतर्फे गोहे गाव येथे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सुमारे 155 रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतल्याचे भाजपचे तालुकाध्यक्ष बापू घारे यांनी सांगितले. खालापूर तालुका मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. विकास कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. मनोज मिश्रा, डॉ. गणेश मोरे, डॉ. बबन नागरगोजे, डॉ. संजय पाटील यांनी शिबिरातील रुग्णांची आरोग्य तपासणी करून औषध वाटप केले. भाजपचे तालुकाध्यक्ष बापू घारे यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आलेल्या या शिबिराला जिल्हा चिटणीस शरद कदम, भाजप माथाडी कामगार संघटना जिल्हाध्यक्ष शशिकांत मोरे, खालापूर तालुका उपाध्यक्ष मोहन घाडगे, संदीप मोरे, निलेश शिंदे, उपसरपंच अमित सावंत, ज्ञानेश्वर शिंदे, रमाकांत शिंदे, संजय शिंदे, मनोहर वाघमारे, जानू वाघमारे यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. भाजप खालापूर तालुका मंडळातर्फे प्लास्टिकबंदीसाठी रॅली काढण्यात आली, तसेच आयुष्यमान भारत योजनेचे कार्डवाटपही करण्यात आल्याचे बापू घारे यांनी सांगितले.

Check Also

पनवेल मनपा प्रभाग समित्यांवर भाजप महायुतीचे चारही उमेदवार विजयी

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका प्रभाग समित्यांच्या सभापतिपदाची निवडणूक मंगळवारी (दि.११) पार पडली. या निवडणुकीत …

Leave a Reply