Breaking News

मुंबई मॅरेथॉन 30 मे रोजी

मुंबई : प्रतिनिधी
जानेवारीच्या तिसर्‍या आठवड्यात रंगणारी टाटा मुंबई मॅरेथॉन यंदा 30 मे रोजी आयोजित करण्यात आली आहे. कोरोनामुळे या शर्यतीच्या आयोजनाविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.
या संदर्भात संयोजक प्रोकॅम इंटरनॅशनलने पत्रकात म्हटले आहे की, सावधगिरीने पावले टाकत सर्वांशी चर्चा करून मोठ्या आशेने हा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर भारतीय तसेच आंतरराष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स महासंघ आणि राज्य सरकार, अन्य प्रशासकीय विभागांशी चर्चा करून एकत्रितपणे ही स्पर्धा आयोजित करण्याचे आम्ही ठरवले आहे.
‘केंद्र आणि राज्य सरकारच्या प्रमाणित कार्यप्रणालीनुसार पूर्ण मॅरेथॉन, अर्धमॅरेथॉन तसेच 10 किमी शर्यत या तीन गटांत होणार्‍या या स्पर्धेत मर्यादित धावपटूंना प्रवेश देण्यात येणार आहे. सहभागी स्पर्धक, स्वयंसेवक, पदाधिकारी यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येईल,’ असेही पत्रकात म्हटले आहे.

Check Also

दिवाळी अंकांतून साहित्य क्षेत्राला नवी उंची -मंत्री आशिष शेलार

रौप्य महोत्सवी स्पर्धेचे पारितोषिक वितरण पनवेल : रामप्रहर वृत्तलोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेले …

Leave a Reply