पनवेल : रामप्रहर वृत्त
विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत भारतीय जनता पक्षामध्ये इनकमिंग सुरूच असून, कानपोली आणि हेदुटणे येथील शेकाप व काँग्रेस पक्षाच्या असंख्य पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी गुरुवारी (दि. 10) भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. सर्व प्रवेशकर्त्यांचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पक्षाची शाल देऊन स्वागत केले. या पक्षप्रवेश कार्यक्रमास भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, उपाध्यक्ष लक्ष्मणशेठ पाटील, ओबीसी सेल मोर्चा जिल्हाध्यक्ष एकनाथ देशेकर, पोलीस पाटील दशरथ पाटील, विनोद पाटील, अशोक साळुंके, बाळकृष्ण पाटील, कानपोलीचे सरपंच कैलास पाटील, प्रदीप मते, प्रकाश खैरे, राजेश पाटील, जोमा पाटील, हरिग्रामचे सदस्य बुधाजी पारधी आदी उपस्थित होते. सिडको अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सक्षम नेतृत्वावर विश्वास ठेवून कानपोली आणि हेदुटणे येथील काँग्रेस व शेतकरी कामगार पक्षातील उपसरपंच नागा गिरा, सदस्य हिरामण उघडा, पंच बामा उघडा, बाल्या उघडा, जोमा उघडा, महादू गिरा, माल्या चौधरी, धर्मा उघडा, गोमा उघडा, कमळी उघडा, आल्या उघडा आदी कार्यकर्त्यांनी या वेळी विकासाचे ‘कमळ’ हाती घेतले.