नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त
ख्रिश्चन अल्पसंख्याक समुदायाच्या वतीने नवीन पनवेल येथील पृथ्वी हॉलमध्ये शांती महोत्सव भरविण्यात आला होता. त्याचे औचित्य साधून माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा सत्कार करण्यात आला, तसेच मान्यवरांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश करून महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना आपला पाठिंबा जाहीर केला.
या कार्यक्रमास भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष विजय पाटील, यॅलीस्टस वर्गीस, तानाजी बानखले, संजय नाईक, तुकाराम पवार यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आपले मनोगत व्यक्त करून शांती महोत्सवास शुभेच्छा दिल्या. या वेळी विकास गायकवाड, सुब्रत नायक, आहीरीस पिंटो, स्टिवल पिंटो, अमिता साधराणी, आवंता भोईर, विजय नवरे, विठ्ठल पवार, श्रीकांत मुळे, नितीन झगडे, वीरेंद्र यादव, जयेश गुंजाळ, महेश ब्रदर, लक्ष्मी इनामदार, अनिता सोमल, जस्टीन सोमल, विशाल गाडे, तुकाराम पवार, रंगनाथ इंदोरे, संगीता यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर पक्षप्रवेश केला.