किरण मढवी यांचा स्तुत्य उपक्रम
पनवेल ः प्रतिनिधी
देशभरात 1 ते 7 जुलै हा सप्ताह जागतिक वन महोत्सव अर्थात वनक्षेत्र वाढीकरिता पर्यावरणाशी निगडित समाजकार्य करून सर्वत्र साजरा होतो, मात्र या वर्षी कोरोनाच्या संकटामुळे आणि जनता कर्फ्यूमुळे अनेक पर्यावरणप्रेमींना यापासून वंचित राहिल्याची खंत नक्कीच वाटत असेल. तरही उलवे येथील समाजसेवक किरण मढवी यांनी वन महोत्सव सप्ताहात घरच्या घरीच काही बियांची कुंडी आणि सिड ट्रेमध्ये लागवड करून रोपनिर्मिती संकल्पाचे कार्य सुरूच ठेवले.
त्यांच्याजवळील उपलब्ध सीताफळ, लिंब, कडूलिंब आदी बियांचे 1000 सिडबॉल करून त्यांना उरण तालुक्यातील गव्हाण फाटा ते चिरनेर मार्गावरील रस्त्याच्या दुतर्फा आणि उलवे नोड येथील रेल्वेच्या रस्त्यांच्या आजूबाजूला हे सिडबॉल टाकून वन महोत्सव साजरा केला. समाजसेवक किरण मढवी यांनी आजच्या कठीण परिस्थितीतही निसर्ग संवर्धनाबाबत केलेले हे सेवाभावी कार्य नक्कीच कौतुकास्पद आहे.