Breaking News

भाजप प्रवेशाच्या सरीवर सरी ; शेकापचे वारदोली, केवाळे येथील पदाधिकारी, कार्यकर्ते दाखल, तक्क्यातील सामाजिक कार्यकर्त्यांच्या हातीही ‘कमळ’

पनवेल : रामप्रहर वृत्त

भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार्‍यांंंचा ओघ दिवसेंदिवस वाढतच असून, शेतकरी कामगार पक्षाचे वारदोली आणि केवाळे येथील पदाधिकारी, तसेच तक्का मोराज सोसायटी येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी शनिवारी

(दि. 12) विकासाचे ‘कमळ’ हाती घेतले. सर्व पक्षप्रवेशकर्त्यांचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी भाजपमध्ये स्वागत केले.

माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या पनवेल येथील निवासस्थानी झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमास भाजप शहर अध्यक्ष जयंत पगडे, जिल्हा उपाध्यक्ष एकनाथ भोपी, पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, माजी सदस्य निलेश पाटील, वाकडीचे सरपंच नरेश पाटील, सतीश पाटील, वारदोलीचे माजी सरपंच भरत पाटील, राजाराम माळी, गोटीराम गायकर, शशिकांत गायकर, संजय पाटील, पद्माकर म्हस्कर, सोमनाथ माळी, अण्णा पालकर, माजी सरपंच प्रकाश माळी, रोहिदास माळी, स्वतंत्र अण्णा पालकर, प्रभाग क्रमांक 20चे अध्यक्ष मनोहर मुंबईकर, नगरसेवक अजय बहिरा, माजी नगरसेवक प्रभाकर बहिरा, संदीप बहिरा, प्रतीक बहिरा, अण्णा भगत, भरत बहिरा आदी उपस्थित होते.

या वेळी पनवेल तालुक्यातील शेतकरी कामगार पक्षाचे वारदोली गु्रप ग्रामपंचायतीचे माजी सरपंच पंढरीनाथ पाटील, सदस्य अरुण पाटील, केवाळे येथील योगेश माळी, दिलीप माळी, विश्वास माळी, तक्का येथील सामाजिक कार्यकर्ते पिंटू राय, अमित खैरालीय, सत्यनारायण रेटी, निखिल दळवी, राजेश तळे, विजय राऊत, मोहसिन फकीर, संदेश दिवे, धोराल गारे यांनी भाजपत जाहीर प्रवेश केला.

Check Also

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …

Leave a Reply