Breaking News

पनवेलमध्ये शेकापला हादरा

डॅशिंग नेते एस. के. नाईक हजारो समर्थकांसह भाजपमध्ये

पनवेल ः रामप्रहर वृत्त
पनवेलमधील शेकापचे डॅशिंग नेते एस.के. नाईक यांनी त्यांच्या हजारो समर्थकांसह शुक्रवारी (दि. 27) भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. नाईक यांनी जिल्हा परिषद सदस्य आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती म्हणून काम केले असून शहरातील महात्मा ज्योतिबा फुले हातगाडी संघटनेचे ते संस्थापक अध्यक्ष आहेत. त्यांच्यासोबत पदाधिकारी, कार्यकर्ते व सहकार्‍यांनी केलेल्या या प्रवेशामुळे शेकापला हादरा बसला आहे.
पनवेल शहरातील मार्केट यार्ड येथे झालेल्या कार्यक्रमात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, शहराध्यक्ष अनिल भगत, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील यांच्या हस्ते प्रवेशकर्त्यांचे भारतीय जनता पक्षात स्वागत करण्यात आले.
या कार्यक्रमास माजी उपमहापौर चारुशीला घरत, तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, भूपेंद्र पाटील, माजी नगरसेविका दर्शना भोईर, शहर सरचिटणीस अमित ओझे, माजी जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, शहर कोषाध्यक्ष ज्योती देशमाने, उपाध्यक्ष प्रीतम म्हात्रे, प्रमोद भिंगारकर यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
या वेळी शेकाप नेते एस.के. नाईक यांच्यासोबत दिलीप अन्नभुले, प्रल्हाद नाईक, रमेश चव्हाण, विजय मेहेर, अनंत कोळी, नारायण आंबोळकर, गुरूनाथ पाटील, सुनील घाडगे, शंकर प्रजापती, शिवाची गाडे, रमेशकुमार गुप्ता, विजय मराठे, महादेव खराटे, महान नाईक, शिवप्पा कंकणवाडी यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते, हजारो समर्थकांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. त्यांचे पक्षात मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले.
दरम्यान, पक्षप्रवेश करण्यापूर्वी कार्यक्रमस्थळी जाताना पाचशेहून अधिक कार्यकर्त्यांचा ताफा मार्गस्थ झाला होता. भाजपचे झेंडे आणि घोषणांनी आसमंत दणाणून गेला.

पनवेलच्या राजकीय इतिहासात हादरा बसणारा
हा पक्षप्रवेश आहे. एस.के.शेठ यांचे पक्षात स्वागत करण्यासाठी स्वतः लोकनेते रामशेठ ठाकूर उपस्थित राहिले. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सबका साथ सबका विश्वास या अनुषंगाने देशातील प्रत्येक घटकासाठी अनेक योजना अमलात आणल्या आणि त्यांची यशस्वी अंमलबजावणीही केली. ज्येष्ठ, महिला, युवा, बाल अशा सर्व पिढीसाठी ते सातत्याने काम करीत आहेत. अशा लोकप्रिय पक्षामध्ये तुम्ही सहभागी झाले आहेत. तुमचा निर्णय योग्य असा आहे.
-आमदार प्रशांत ठाकूर, भाजप मावळ लोकसभा प्रमुख

विश्वाचे नेते असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जगातील सर्वांत मोठ्या पक्षात तुम्ही दाखल झाला आहेत. तुमच्या प्रवेशाने ताकद वाढली आहे. काही वर्षांपूर्वी नगरपालिकेत भाजपला ताकद नव्हती. सत्ता तर दूर, पण नगरसेवकही नव्हते, परंतु लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिलेल्या ताकदीमुळे पनवेल महापालिकेत भाजपने एकहाती सत्ता मिळवली. त्यामध्ये तुमच्या प्रवेशाने आणखी बळ मिळाले आहे.
-अविनाश कोळी, भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष

एस. के. नाईक यांच्या नेतृत्वाखाली तुफान गर्दीने त्यांचे समर्थक भाजपमध्ये दाखल झाले आणि त्यांनी चांगला निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आपला देश झपाट्याने प्रगती करीत आहे आणि या जगातील सर्वोत्तम पक्षात तुमचा प्रवेश झाला असून तुमचे पक्षात हार्दिक स्वागत.
-अरुणशेठ भगत,
भाजप पनवेल तालुकाध्यक्ष

भारतीय जनता पक्षात काम करणार्‍यांना संधी मिळते आणि तुम्ही काम करणारे सक्रिय कार्यकर्ते आहात. त्यामुळे पक्ष तुमच्या पाठीशी आहे. आपली ताकद पक्षाला अधिक मजबूत करेल.
-नितीन पाटील, भाजप उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीस

 

Check Also

गणेशोत्सवानिमित्त सोमवारी शिवाजीनगर येथे श्री सत्यनारायण महापूजा व महाप्रसादाचे आयोजन

पनवेल : रामप्रहर वृत्त गणेश उत्सवानिमित्त सोमवारी (दि. 9) शिवाजीनगर येथे माजी खासदार लोकनेते रामशेठ …

Leave a Reply