Breaking News

एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होऊन सौजन्याने वागावे -दौंडकर

पनवेल : वार्ताहर

सर्वच समाजातील लोकांनी जातीय सलोखा वाढविण्याचा प्रयत्न करावा, सुखदुःखात सहभागी होऊन एकमेकांशी सौजन्याने वागणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रवींद्र दौंडकर यांनी त्यांच्या कार्यालयात प्रतिष्ठीत नागरिक, समाजसेवक, शांतता कमिटी सदस्य, मोहल्ला कमिटी सदस्य यांच्या घेतलेल्या एकत्रित बैठकीत मार्गदर्शन करताना केले.

या वेळी बोलताना दौंडकर म्हणाले की, सर्व मोहल्ला कमिटी व शांतता कमिटीवर असणार्‍या सदस्यांनी गावातील प्रत्येक राजकीय, जातीय धार्मिक कार्यक्रम व चालू घडामोडीबाबत पोलीस ठाण्यात किंवा संबंधित भेट किंवा गोपनीय विभागाला तात्काळ माहिती कळविणे आवश्यक आहे. सर्व मोहल्ला कमिटी व शांतता कमिटीत असणार्‍या सदस्यांनी कोणत्याही राजकीय पक्षाची किंवा धर्माची एकतर्फी बाजू घेवू नये, गावात तटस्थ भूमिका ठेवून सर्वधर्म समभाव या प्रकारे वागणूक ठेवावी, आपापल्या गावात असणारे हिंदू व मुस्लीम लोकांशी जातीय सलोखा वाढविण्याचा प्रयत्न करावा, त्यांच्या सुखदुःखात सहभागी होवून त्यांच्याशी सौजन्याने वागावे.

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर घ्यावयाची दक्षता, उपाय योजना व वाढत्या गुन्हेगारी संदर्भात घ्यावयाची काळजी, तसेच संपूर्ण परिसर सीसीटीव्ही नियंत्रणाखाली आणण्याकामी दौंडकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply