Breaking News

‘बालदींवरील टीकेला जाहीर सभेत उत्तर देणार’

पनवेल : प्रतिनिधी

विकासावर न बोलता जातीच्या नावाने राजकारण करणार्‍यांना जाहीर सभेच्या माध्यमातून उत्तर देणार असल्याची माहिती उरणचे तालुकाध्यक्ष रवी भोईर यांनी दिली. उरण विधानसभा क्षेत्रातील डॅशिंग नेते व उमेदवार महेश बालदी यांना वाढता प्रतिसाद पाहता विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे, त्यामुळे विरोधक जातीचा प्रचार करून जनतेची दिशाभूल आणि समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे विरोधकांना त्याचे उत्तर 13 ऑक्टोबर रोजी करंजाडे व मोहोपाडा येथे होणार्‍या जाहीर सभेच्या माध्यमातून देण्यात येईल, असे रवी भोईर यांनी सांगितले.

Check Also

खोपोली येथील विविध समाज घटकांतील कार्यकर्ते भाजपमध्ये

आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती खोपोली : प्रतिनिधीभाजपचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस तथा पनवेलचे कार्यसम्राट …

Leave a Reply