Breaking News

कार्यतत्पर आमदार प्रशांत ठाकूर यांना विविध संस्था-संघटनांचा पाठिंबा

पनवेल : रामप्रहर वृत्त

पनवेल विधानसभा मतदारसंघातील भाजप, शिवसेना, आरपीआय व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांना विविध सामाजिक संस्था व संघटनांनी पाठिंबा जाहीर केला आहे. अश्वत्थामा ज्येष्ठ नागरिक संघ नवीन पनवेल, मैत्री संस्था, दीपक फर्टिलायझर अ‍ॅण्ड पेट्रोकेमिकल्स तळोजाचे माथाडी कामगार टोळी नंबर 6289, श्री संत रोहिदास चर्मकार संघटना खारघर, अपंग क्रांती संघटना आणि प्रजापती फाऊंडेशन यांनी आपल्या पाठिंब्याचे पत्र माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर यांना दिले. या वेळी पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर, भाजपचे पनवेल तालुका उपाध्यक्ष अशोक मोटे, अश्वत्थामा ज्येष्ठ नागरिक संघ नवीन पनवेलचे अध्यक्ष प्रकाश विचारे, कोषाध्यक्ष रमेश धामणे व पदाधिकारी, दीपक फर्टिलायझरचे मुकादम एच. एस. जाधव, जे. एन. पवार, श्री संत रोहिदास चर्मकार संघटना खारघरचे संस्थापक शंकरशेठ ठाकूर, अध्यक्ष जगदिश ठाकूर, उपाध्यक्ष सुरेश उनवणे, सचिव राजेंद्रकुमार कारंडे, खजिनदार सखाराम ठोसर, अपंग क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बी. जी. पाटील, जिल्हाध्यक्ष विलास फडके व पदाधिकारी, प्रजापती फाऊंडेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष मनोज प्रजापती, सचिव आर. बी. प्रजापती, कोषाध्यक्ष सुरेशचंद्र प्रजापती, पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

Check Also

रायगड तायक्वांडो असोसिएशनतर्फे बेल्ट परीक्षा उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव

आमदार प्रशांत ठाकूर यांचा विशेष सत्कार पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड तायक्वांडो असोसिएशनच्या वतीने बेल्ट परीक्षेत …

Leave a Reply